PostImage

Ujjwala kale

Jan. 17, 2024   

PostImage

सिध्दार्थच्या अफेअरबद्दल समजताच स‌ई म्हणाली 'ही....? I मितालीलाबघताच अशी होती …


मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा येतोय. खऱ्या आयुष्यात एकमेकांचे एवढे चांगले मित्र असणारे हे दोघं मोठ्या पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारत आहेत.सईला जेव्हा सिद्धार्थ आणि मितालीच्या अफेअरबद्दल समजलं तेव्हा तिची काय रिअॅक्शन होती याचा किस्साही तिने सांगितला.

 

'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, "सिद्धार्थने पहिल्यांदा मितालीसोबतचा सेल्फी शेअर केला होता. तेव्हा सईने त्याला चिडवणारा रिप्लाय दिला होता. यावेळी सईने एक किस्साही सांगितला. ती म्हणाली,'जेव्हा मी मितालीसोबत याचा फोटो बघितला तेव्हा माझं असं झालं की, ही...?' याचं कारण हे की, मिताली आणि मी अनुबंध नावाच्या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हा मिताली अगदी एवढीशी होती. १० ते १२ वर्षांची मिताली मी पाहिली आहे. मग माझं असं झालं की हा काय योगायोग आहे? मितालीसोबत याचं कसं आणि कुठे जमलं असा मला प्रश्न पडला."

 

सई पुढे म्हणाली, "मित्रांच्या बाबतीत नेहमी असं असतं की तू खूश आहेस ना? मग ठीक आहे. सिद्धार्थच्या बाबतीतही माझं असंच आहे. उद्या तो पाप जरी करुन आला तरी मी तिला पाठीशी घालेन एवढं माझं त्याच्यावर प्रेम आहे. तुला ओके वाटलं आहे ना हे मग ठीके मी आहे तुझ्यासोबत अशी मैत्री असल्यामुळे मी फार प्रश्न विचारले नाहीत. कारण मी मितालीला ओळखत होते. तेव्हा ती लहान असली तरी माणूस कळतोच की आपल्याला. त्यामुळे फक्त खूश आहेस ना नक्की आहे ना, म्हणजे हेच फायनल आहे का? एवढं विचारलं."सई आणि सिद्धार्थचा 'श्रीदेवी प्रसन्न' 4 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. तर विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


PostImage

Ujjwala kale

Dec. 23, 2023   

PostImage

हुथी बंडखोरांनी भारताच्या अरबी समुद्रात ड्रोननी केला जहाजावर केला हल्ला


भारतीय किनारपट्टीजवळील हिंदी महासागरात लायबेरियाचा ध्वज असलेल्या टँकरवर ड्रोनने हल्ला केला आहे. अरबी समुद्रात झालेल्या या हल्ल्याला अनेक अहवालांमध्ये पुष्टी मिळाली आहे. याआधी ब्रिटनच्या मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन ऑर्गनायझेशनने या हल्ल्याची माहिती दिली होती.हल्ल्यात जहाजावर उपस्थित असलेल्या क्रू मेंबरला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे व्यापारी जहाज आपल्या गंतव्य भारताकडे प्रवास करत आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर जहाजाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जहाजावर उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. येमेनच्या हुथींवर या हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

ड्रोन हल्ल्यानंतर भारतात येणाऱ्या जहाजाला आग लागली. यापूर्वी इस्रायलच्या हल्ल्याला विरोध करणाऱ्या येमेनच्या हुथी बंडखोरांनी भारतात येणाऱ्या एका जहाजाचे अपहरण केले होते. एवढेच नाही तर, हुथींनी लाल समुद्रात अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत, ज्यामुळे अनेक जहाजांचे नुकसान झाले आहे. हुथींना इराणचा उघड पाठिंबा आहे आणि ते हमासच्या समर्थनार्थ सातत्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आहेत. त्यामुळे जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्गांपैकी एक असलेला सागरी मार्ग आता धोक्यात आला आहे. यामुळेच आता अनेक कंपन्या आफ्रिकेतून व्यवसाय करत आहेत. यासाठी खूप खर्च होत आहे.

 

यापूर्वी, हुथींच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने एडनच्या आखातात दोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज नाशक तैनात केले होते. या संपूर्ण भागात भारतीय जहाजांचे संरक्षण करण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत. त्याच वेळी, हुथी बंडखोर सतत त्यांचे हल्ले वाढवत आहेत आणि याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने २० देशांसोबत एक सागरी फौज तयार केली आहे, जेणेकरून प्रत्युत्तराची कारवाई करता येईल. तरीही हुथींचे हल्ले काही केल्या कमी होत नाहीयेत.


PostImage

Ujjwala kale

Aug. 22, 2023   

PostImage

SACHIN TENDULKAR DESIGNATED AS `NATIONAL ICON, OF ELECTION COMMISION WILL …


NEW DELHI: Cricketing legend Sachin Tendulkar will on Wednesday be designated as a "national icon" of the Election Commission (EC) to encourage greater voter participation in the electoral process.                                                                                                                                

A memorandum of understanding will be signed between Tendulkar and the poll panel here on Wednesday.

As part of the three-year agreement, Tendulkar will spread voter awareness.

"This collaboration would mark a significant step towards leveraging Tendulkar's unparalleled impact with the youth for increasing voters' participation in the forthcoming elections, especially in general elections (to Lok Sabha), 2024," the EC said in a statement.

Through the partnership, the EC seeks to address the challenges of urban and youth apathy towards voting.

The EC has been associating itself with renowned Indians from various fields by designating them as its "national icons" to motivate voters to participate in the electoral process.

Last year, the commission recognised actor Pankaj Tripathi as a national icon.

Earlier, during the 2019 Lok Sabha elections, stalwarts such as MS Dhoni, Aamir Khan and Mary Kom had been the EC's national icons.